![]() |
गडहिंग्लज : वडरगे रोडवरील रस्ता कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देताना नागरिक (छाया :मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील वडरगे रोड येथे सुरू असणारे रस्त्याचे काम विकास आराखड्यातील रुंदी प्रमाणे करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम उपअभियंत्यांकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गडहिंग्लज मधील वडरगे रोडवर रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम विकास आराखड्यातील रुंदी प्रमाणे होत नसल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे विकास आराखडा व प्रादेशिक आराखडा यामध्ये असणाऱ्या रुंदी प्रमाणेच या रस्त्याचे काम करण्यात यावे. सदरच्या रस्त्यावर कायमस्वरूपी मोठी वर्दळ असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही येथून सतत ये-जा असते. सदर रस्त्याचे काम हे अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे मात्र हे काम विकास आराखड्यातील रुंदी प्रमाणे करण्यात यावे. सदर कामाची पाहणी करून तातडीने योग्य त्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर धनंजय मोरबाळे यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत.