तेरणी : येथील मराठी विद्या मंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शिक्षक व गावातील पदाधिकारी.
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तेरणी येथील मराठी विद्या मंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढून जनजागृतीही करण्यात आली.
![]() |
तेरणी : येथील मराठी विद्या मंदिरात शाळेचा प्रारंभ करताना सरपंच मोसिम मुल्ला, उपसरपंच आक्काताई हजेरी, सदस्य करवीर उथळे व इतर. |
यंदाच्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ शिक्षकांनी मोठ्या उत्साहात केला. प्रारंभी शाळेच्या मुख्य गेटवर सरपंच मोसिम मुल्ला यांच्या हस्ते फित कापून शाळेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच आक्काताई हजेरी, सदस्य करवीर उथळे त्यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा व इतर ग्रामस्थ सर्व शिक्षक उपस्थित होते.
![]() |
तेरणी : गावातून काढण्यात आलेली विद्यार्थ्यांची प्रभात फेरी. |