🔘राष्ट्रवादी प्रणित शेतकरी पॅनेलने सर्वच्या सर्व १२ जागा जिंकल्या
🔘विजय उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
![]() |
| बसर्गे खुर्द : येथील मसणकवा सेवा संस्थेच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांसह जल्लोष करताना कार्यकर्ते. |
हलकर्णी ( सुनील भुईंबर ): बसर्गे खुर्द येथील मसणकवा सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारुढ राष्ट्रवादी प्रणित शेतकरी पॅनेलने सर्व १२ जागा जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले. विरोधी पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले.
निवडणूक बिनविरोधसाठी दोन्ही आघाडीकडून प्रयत्न झाले,पण तडजोडीत एकमत न झाल्याने निवडणूक लागली. रविवार दि. १९ . रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत बसर्गे येथील शंकरराव नाडगोंडे विद्या मंदिर येथे अत्यंत चुरशीने मतदान झाले. एच.बी खोत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. १८१ पैकी १५६ सभासदांनी मतदान केले. संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरवात झाली व निकाल जाहीर करण्यात आला. कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांसह फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
यावेळी माजी जि.प. सदस्य जयकुमार मुन्नोळी, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील , राजु मुनोळी यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ. गंगाधर व्हसकोटी, विजय शेरवी, प्रसाद जोशी, प्रसाद जाधव, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.
विजयी उमेदवार असे : केदारी कागिनकर , सातापा गुरव, रविकुमार देसाई , शिवाजी पाटील , राजू मुन्नोळी, रत्नाबाई व्यापारी , आपया हिरेमठ , परवया हिरेमठ , हमिद पानारी , कौशल्या जाधव , लक्ष्मी पाटील , विठठल धनगर , प्रियंका मऱ्यापगोळ (बिनविरोध ) .

