
हलकर्णी ( सुनील भुईंबर ) : राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक २२ जून रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हलकर्णी (तालुका गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत जवळ करंबळीअण्णा गोडाऊन येथे लायन्स नेत्र रुग्णालय सांगली यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात मोती बिंदू ,नेत्रभिंगारोपण, अत्याधुनिक मशीनद्वारे नेत्र शस्त्रक्रिया, काचबिंदू,लासरू तिरळेपणा, डोळ्याची प्लास्टिक सर्जरी इत्यादी उपचार करण्यात येणार आहेत. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांमार्फत नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात तपासणीनंतर मोतीबिंदू निर्माण झालेल्या रुग्णांना लायन्स रुग्णालय येथे जाण्या-येण्यासाठी तसेच जेवणाची,राहण्याचीही मोफत सुविधा करण्यात आली आहे. या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन डॉ. गंगाधर व्हसकोटी यांनी केले आहे.
