हलकर्णी ( सुनील भुईंबर ): बसर्गे एज्युकेशन सोसायटीचे नंदनवाड येथील श्री शिवराय हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. पूर्व भागात मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या प्रशालेची ओळख आहे. ४४ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष श्रेणीमध्ये १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, प्रथम श्रेणीमध्ये ३० विद्यार्थ्यांनी यश मिळविले , तर द्वितीय श्रेणीमध्ये एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला . प्रज्ञा संदीप गवळी व रितेश संभाजी गुरव ह्या विद्यार्थ्यांनी ९२.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. प्रतीक्षा पंडित बिर्जे हिने ८८.८० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर साक्षी संजय बामणे हिने ८७.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या उज्वल यशाचे संपूर्ण पूर्व भागात सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना बसर्गे एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा वर्षादेवी नाडगोंडे सरकार, उपाध्यक्ष कौस्तुभ नाडगोंडे सरकार, सचिव आर. बी. टेळे, व सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले. मुख्याध्यापक राजेश चव्हाण, प्रकाश जोडगुद्री, अशोक शिंदे, विठ्ठल कुंभार, अमित नंद्यानावर, यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
