गडहिंग्लज (प्रतिनिधी): काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्यासह गांधी कुटुंबाला बदनाम करण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करत इडीच्या चौकशीचा ससेमिरा लावून विरोधकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ येथील प्रांत कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, भाजप सरकारच्या वतीने चाललेली दडपशाही, भ्रष्टाचार, वाढती महागाई, बेरोजगारी तसेच केंद्राच्या अधिपत्याखालील काँग्रेसच्या काळातील सार्वजनिक कंपन्या विक्रीचा घाट, अग्निपथच्या नावाखाली सैन्य भरतीमध्ये युवकांची दिशाभूल झालेले आहे. यावेळी हिरा शुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे, प्रा.आझाद पटेल, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
या धरणे आंदोलनात ॲड. दिग्विजय कुराडे, राजशेखर यरटे,अजित बंदी, तमन्ना पाटील, फत्तेसिंह नलवडे, महेश तूरबतमठ, दयानंद पट्टणकुडी, संतोष चौगुले, प्रा. तानाजी चौगुले, प्रा. विक्रम शिंदे, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, जे.वाय. बारदेस्कर, हारुण सय्यद, जयसिंग चव्हाण, विश्वजीत कुराडे, प्रा. स्मिता पाटील, प्रा.श्रद्धा पाटील, प्रा. बेलेकर रामदास पाटील, उत्तम नाईक, ॲड. भास्कर पाटील, युवक अध्यक्ष अक्षय पाटील, नारायण पाटील, हसन मकानदार,वीरसिंग बिलावर, देवाप्पा तूपुरवाडकर, रणजित कांबळे, उत्तम देसाई मारुती कांबळे, ईश्वर देसाई, आय.डी .देसाई, चेतन मोहिते, रावसाहेब पाटील, सुमित चौगुले, अभिजीत भाटले,विनायक कटकोळे, सुरेश घुगरे, प्रकाश भोसले, सुशीला माने, मारुती नाईक, शिवाजी सावंत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार जोतीराम केसरकर यांनी मानले.


