गडहिंग्लज (प्रतिनिधी) : सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) मध्ये निवड झाल्याबद्दल सविता कल्लाप्पा नाईक व दिल्ली येथील राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे यश मिळवल्याबद्दल तबसुम गुलाब छडेदार या दोघींचा तेरणी (ता.गडहिंग्लज) येथील महालक्ष्मी पतसंस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. तसेच संगमेश्वर विकास सेवा संस्थेतही सत्काराचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी सविता नाईक हिचा सत्कार महालक्ष्मी पतसंस्थेचे संचालक बिकनसो बजरू तर तबसुम छडेदार हिचा सत्कार संस्थेचे चेअरमन करवीर इंगवले यांच्या हस्ते करण्यात आला. महालक्ष्मी पतसंस्थेचे संचालक काशाप्पा फडके, मॅनेजर करवीर उथळे, सतबा व्हनोळी, संगमेश्वर सेवा संस्थेचे अध्यक्ष अण्णासो देसाई, उपाध्यक्ष बसवंत फडके, संचालक नागेश देसाई, बापू जमादार, संचालिका सौ. साधना इंगवले, वैशाली सुतार, बापू जमादार, ग्रामपंचायत सदस्य रमेश पुजेरी तसेच केंपया पटदेवरू, महालक्ष्मी पतसंस्थेचे कर्मचारी दुंडाप्पा कांबळे, कल्लाप्पा गळाटी यांच्यासह इतर उपस्थित होते.
श्री.संगमेश्वर सेवा संस्थेतही सत्कार
गडहिंग्लज : सविता नाईक व तबसुम छडेदार यांचा संगमेश्वर सेवा संस्थेच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. येथे संचालिका वैशाली सुतार यांच्या हस्ते या दोघींचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी संगमेश्वर सेवा संस्थेचे अध्यक्ष अण्णासो देसाई, उपाध्यक्ष बसवंत फडके, संचालक नागेश देसाई, बापू जमादार, शिवाजी नाईक, करवीर नावलगी, ईराप्पा चौगुले, संचालिका सौ. साधना इंगवले यांच्यासह कर्मचारी दुंडाप्पा चौगुले व इतर उपस्थित होते.


