हलकर्णी ( सुनील भुईंबर ): महाराष्ट्र- कर्नाटक सीमारेषेवर असलेल्या नांगनूर येथील श्री राम हायस्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. ५५ पैकी सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवत उत्तीर्ण झाले. यामध्ये २९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले, २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर ५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीने यश मिळविले.
धनश्री दत्तात्रय वाघमोडे हिने ९५ .६० गुणासह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ऐश्वर्या आपय्या बोरगल्ली हिने ९५ .४० टक्के घेत द्वितीय क्रमांक मिळविला तर नम्रता नेमिनाथ तेरदाळे हिने ९२. ६० टक्के घेत प्रशालेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी व पालक वर्ग यांच्यातील सहकार्यामुळे या प्रशालेने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ए. बी. कल्याणी,एस. डी. वाडकर , टी . बी . आमगे , पी.ए. कुलकर्णी , डी.ए. वाघमोडे, एस.एस. नाईक, एस.एन. पाटील यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
