हत्तरगी (वार्ताहर): एन.सी. सी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून अनुराधा अरुण जाधव (वय २०,राहणार कोट,तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव) या विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलीस स्थानकात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मयत विद्यार्थिनी ही संकेश्वर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिला एन.सी.सी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने ती निराश झाली होती. या नैराश्यातून तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी यमकनमर्डी पोलीस स्थानकात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
