अकरा महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : यंदा बारावी परीक्षेत गडहिंग्लज तालुक्यातही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.४५ टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.९३ टक्के इतके आहे. त्यामुळे या निकालात मुलींनी बाजी मारल्याचे दिसून आले. तालुक्यात एकूण अकरा महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. सायन्स विभागात १० महाविद्यालयांचा तर कॉमर्स विभागात १३ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. होकेशनल विभागात दोन महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. गडहिंग्लज तालुक्याचा एकूण निकाल ९८.६८ टक्के इतका लागला आहे.
बुधवारी दुपारी एक वाजता इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल बोर्डाने जाहीर केला. गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बारावीच्या परीक्षेचा निकाल मूल्यमापनाच्या आधारावर जाहीर केला होता.यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पेढे वाटून तसेच फटाके वाजवून आपला आनंद व्यक्त केला.
११ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के
गडहिंग्लज तालुक्यातील अकरा महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यामध्ये साधना ज्यूनियर कॉलेज, हिडदुगी हायस्कूल, भावेश्वरी ज्यूनियर कॉलेज हेब्बाळ- जलद्याळ, क्रिएटिव्ह कॉलेज ऑफ सायन्स, साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सेंट झेवियर ज्यूनियर कॉलेज नेसरी, मराठा मंदिर कॉलेज ऑफ कॉमर्स गडहिंग्लज, साधना ज्युनियर कॉलेज होकेशनल, भालचंद्र कुलकर्णी ज्यूनियर कॉलेज, दूरदुंडेश्वर ज्यूनियर कॉलेज मुत्नाळ, रुरल कॉलेज ऑफ पॅरामेडिकल होकेशनल विभाग यांचा समावेश आहे.
सायन्समध्ये दहा महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के सायन्स विभागात एकूण दहा महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये संभाजीराव माने कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स गडहिंग्लज, साधना हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स गडहिंग्लज, जागृती ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स गडहिंग्लज, गडहिंग्लज हायर सेकंडरी स्कूल गडहिंग्लज, छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज नेसरी, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नूल, केदारलिंग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कडगाव, भालचंद्र कुलकर्णी ज्युनियर कॉलेज, सेंट झेवियर जुनियर कॉलेज नेसरी, मराठा मंदिर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स गडहिंग्लज यांचा समावेश आहे.
कॉमर्समध्ये १३ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के कॉमर्स विभागात एकूण १३ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये संभाजीराव माने कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स गडहिंग्लज, साधना हायस्कूल अँड ज्यूनियर कॉलेज ऑफ सायन्स, जागृती ज्यूनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स गडहिंग्लज, छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज नेसरी, हलकर्णी भाग हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज नूल, भावेश्वरी ज्युनियर कॉलेज हेब्बाळ-जलद्याळ, केदारलिंग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कडगाव, भालचंद्र कुलकर्णी ज्युनियर कॉलेज, क्रिएटिव्ह ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स गडहिंग्लज, साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सेंट झेवियर ज्यूनियर कॉलेज नेसरी, मराठा मंदिर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स गडहिंग्लज यांचा समावेश आहे. होकेशनल विभागात तालुक्यातील दोन महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये साधना ज्युनियर कॉलेज गडहिंग्लज, रुरल कॉलेज ऑफ पॅरामेडिकल एज्युकेशन यांचा समावेश आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील विविध महाविद्यालयांचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे : संभाजीराव माने कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स गडहिंग्लज (९९.६९), एम .आर. ज्यूनियर सायन्स महाविद्यालय (९९.५०), साधना हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्स (१०० टक्के), जागृती ज्युनियर कॉलेज (९९.२६टक्के), गडहिंग्लज हायर सेकंडरी स्कूल (९७.३६), महात्मा फुले महागाव (९८.६२), छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज नेसरी (९८.१६), हलकर्णी भाग ज्युनियर कॉलेज (८७.७७), राजा शिवछत्रपती आर्ट्स कॉमर्स कॉलेज कानडेवाडी (९३.६७), न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नूल (९९.०१), हिडदुगी हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज (१०० टक्के), राजर्षी शाहू ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज (९१.३० टक्के), श्री भावेश्वरी ज्युनियर कॉलेज हेब्बाळ-जलद्याळ (१०० टक्के), केदारलिंग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कडगाव (९८.८५), अशोक रावसाहेब देसाई ज्युनियर कॉलेज तेरणी (९४.५४), दूरदुंडेश्वर ज्युनियर कॉलेज मुत्नाळ (१०० टक्के), क्रिएटिव्ह ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स (१०० टक्के), साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (१०० टक्के), सेंट झेवियर ज्युनियर कॉलेज नेसरी (१०० टक्के), मराठा मंदिर कॉलेज ऑफ कॉमर्स गडहिंग्लज (१०० टक्के), साधना ज्युनियर कॉलेज होकेशनल विभाग (१०० टक्के), जागृती ज्युनियर कॉलेज होकेशनल विभाग (९८.२१), हलकर्णी भाग ज्युनियर कॉलेज होकेशनल विभाग (९४.४४)
राज्याचा एकूण निकाल ९४ .२२ टक्के
राज्याचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला असून विभाग निहाय निकाल पुढीलप्रमाणे : पुणे ९३.६१, नागपूर ९६.५२, औरंगाबाद ९४.९७, मुंबई ९०.९१, कोल्हापूर ९५.०७, अमरावती ९६.३४, नाशिक ९५.०३, लातूर ९५.२५, कोकण ९७.२१
बारावीचा निकाल समाधानकारक : गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ
गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे निकाल हा मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आला होता. यंदा कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनीही कमी वेळेत केलेला अभ्यास व धाडस ह्याचे कौतुक करायला हवे. हा निकाल पाहता समाधानकारक म्हणता येईल असे मत गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी नोंदवत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.