![]() |
दड्डी : येथे प्रतिक्षा माने हिचा सत्कार करताना गुरुसिद्धेश्वर स्वामीजी. यावेळी उपस्थित शंकरराव भांदुर्गे, एम. बी.सालगुडे, श्री. बेटगिरी. |
दड्डी येथील श्रीमती सुंदराबाई भांदुर्गे हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार
हत्तरगी (वार्ताहर) : विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांची प्रेरणा यामुळे विद्यार्थी यश मिळू शकतात. असे प्रतिपादन हत्तरगी येथील कारीमठाचे मठाधिपती गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केले.
दड्डी (तालुका हुक्केरी) येथील श्रीमती सुंदराबाई भांदुर्गे हायस्कूल मधील विद्यार्थिनी प्रतिक्षा माने हिने ६२२ गुण घेऊन मराठी माध्यमामध्ये राज्यात पहिली आल्याबद्दल तसेच मराठी, कन्नड माध्यमांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्वामीजींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समितीचे उपाध्यक्ष शंकरराव भांदुर्गे यांच्या पत्नी कै. अलका भांदुर्गे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे बक्षिस व स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रतिक्षा माने हिच्यासह आई प्रज्ञा व वडील पांडुरंग माने यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास शंकरराव भांदुर्गे, एम.बी.सालगुडे, श्री.बेटगिरी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक एम.सी. पाटील यांनी केले.