![]() |
गडहिंग्लज : डॉ. एस. एन. कुलकर्णी यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. एस. एम. कदम. यावेळी उपस्थित इतर मान्यवर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील शिवराज महाविद्यालयात हलकर्णी महाविद्यालय व शिवराज महाविद्यालय सामंजस्य कराराअंतर्गत फिजिक्समध्ये करिअरच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना बिद्री महाविद्यालयाचे डॉ. एस.एन. कुलकर्णी व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीचे डॉ.राजेश घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एम. कदम होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. गौरव पाटील यांनी केले. यावेळी.डॉ.एस. एन. कुलकर्णी यांनी फिजिक्समध्ये करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करताना फिजिक्स विषयात करिअर करणे गरजेचे आहे. फिजिक्स विषयात कोणकोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत याबाबत विस्तृत व सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. त्यातून मिळणाऱ्या संधी किती व कोणत्या प्रमाणात सध्या उपलब्ध आहेत याची माहिती दिली. संशोधनाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व समाजासाठी देखील त्याचा उपयोग करावा असे आवाहनही डॉ.कुलकर्णी यांनी यावेळी केले. यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीचे डॉ. राजेश घोरपडे, प्राचार्य डॉ. एस. एम.कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी फिजिक्स विभागाचे डॉ. विजय सावंत, प्रा.रेवती राजाराम, प्रा. तेजस्विनी शिंदे यांच्यासह सर्व प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.आभार पर्यवेक्षक प्रा. राहुल कुंभार यांनी मानले.