महाविद्यालयाचे दहा विद्यार्थी चमकले
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजचा बारावी सायन्स, कॉमर्स व इंग्रजी, मराठी माध्यम तसेच आर्ट्सचा निकाल शंभर टक्के लागला. गडहिंग्लज केंद्रात ९० टक्केच्या पुढे महाविद्यालयाचे दहा विद्यार्थी चमकले आहेत. महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. महाविद्यालयात वर्ग निहाय गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे-
बारावी कॉमर्स इंग्रजी माध्यम : मानसी मनोहर गुरव ९४ टक्के, स्नेहल संजय पोवार ९३टक्के, प्राप्ती झुंजारराव देसाई ९३ टक्के.
कॉमर्स मराठी माध्यम : सानिका बाळू फाळके ८३ टक्के, प्राजक्ता नंदकुमार कुंभार ८३ टक्के, समीक्षा अनिल धामणकर ८२ टक्के.
बारावी सायन्स : दीक्षा रमेश मोरे ८६ टक्के, दिग्विजय दशरथ पाटील ८२ टक्के, पुनम प्रताप मोरे ८२ टक्के.
बारावी आर्ट्स : वेदा चंद्रकांत आजगेकर ८३ टक्के, अवनी अनिलकुमार साळोखे ८० टक्के, नवनाथ विठोबा शिंदे ७७ टक्के.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य डॉ.एस.एम. कदम,पर्यवेक्षक प्रा. टी.व्ही. चौगुले यांच्यासह सर्व ज्युनियर विभागाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.