![]() |
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयाच्या एम.पी.एस.सी परीक्षेतील यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या रॅली प्रसंगी डॉ.अनिल कुराडे, प्रा.सौ. बिनादेवी कुराडे. (छाया: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयाचे एम.पी.एस.सी परीक्षेतील यशस्वी माजी विद्यार्थी ऐश्वर्या नाईक यांची उपाधिक्षक भुमी अभिलेख, श्रद्धा चव्हाण यांची शिक्षणाधिकारी तर सुजय कदम यांची साहाय्यक निबंधक पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सोमवारी गडहिंग्लज शहरातून सवाद्य भव्य रॅली काढत त्यांचा गौरव करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत महाविद्यालयाचे यशस्वी गुणवंत विद्यार्थी यांच्यासह संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम.कदम, प्रा.सौ. बिनादेवी कुराडे, प्रा. शिवाजीराव भुकेले, युवराज बरगे यांच्यासह अन्य मान्यवर, सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकीनंतर महाविद्यालयात संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयात कै.एस.डी.पाटील स्पर्धा परीक्षा केंद्राचे उदघाटन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एम.पी.एस.सी परीक्षेतील यशस्वी माजी विद्यार्थी ऐश्वर्या नाईक, श्रद्धा चव्हाण, सुजय कदम यांचा महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतून करिअर करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवावी. आपण किती अभ्यास करता यापेक्षा कसा अभ्यास करता याला फार महत्त्व आहे. जीवनात यशस्वी होण्याची जिद्द बाळगावी. आपण केलेल्या प्रामाणिक कष्टाला नक्कीच यश मिळते. त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनीही मार्गदर्शन केले. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती ऐश्वर्या नाईक, श्रद्धा चव्हाण, सुजय कदम यांनी आमच्या यशामध्ये शिवराज महाविद्यालयाच्या शिक्षकांनी दिलेले ज्ञान हे आम्हाला यशस्वी करण्यात मोलाचे ठरले आहे. शिवराज महाविद्यालयाचे आमच्यासारखे अनेक अधिकारी तयार व्हावेत यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज यांनी केले. प्रा. सौ बिनादेवी कुराडे, विनाअनुदानित विभागाचे समन्वयक प्रा. आझाद पटेल, फार्मसीचे प्राचार्य संतोष कुरबेट्टी , क्रीडा विभाग प्रमुख डॉ.राहुल मगदूम यांच्यासह अन्य प्राध्यापक, एन.सी.सी कॅडेट, खेळाडू, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले. आभार पर्यवेक्षक प्रा. टी.व्ही.चौगुले यांनी मानले. यावेळी माजी नगराध्यक्ष किरण कदम, वसंतराव यमगेकर, युवराज बरगे, प्रा. शिवाजीराव भुकेले, संजय पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
![]() |
गडहिंग्लज : शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यासह इतर मान्यवर. (छाया : मज्जिद किल्लेदार) |