![]() |
तेरणी : येथील उर्दू विद्या मंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे असे मिरवणुकीने व प्रभातफेरीने स्वागत करण्यात आले. |
गडहिंग्लज(प्रतिनिधी): तेरणी येथील उर्दू विद्या मंदिरात बुधवारी नवागत विद्यार्थ्यांचे प्रवेश,पुस्तक वाटप, प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार असे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
![]() |
तेरणी : येथील उर्दू विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करताना सरपंच मोसिम मुल्ला, सदस्य करवीर उथळे, रमेश पुजेरी व इतर. |
यावेळी शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिलीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व मुलांना पुष्पगुच्छ, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश याचे वितरण सरपंच मोसिम मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य करवीर उथळे, रमेश पूजेरी व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान,सर्व मुलांची गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. या सर्व कार्यक्रमांना मुख्याध्यापक, शिक्षक ,सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, व्यवस्थापन समिती अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते.
![]() |
तेरणी : येथील उर्दू विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांची गावातून काढण्यात आलेली प्रभातफेरी. |