![]() |
मुगळी : येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सेवानिवृत्ती निमित्त केदारी केरुजी यांचा सत्कार करताना गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ. यावेळी उपस्थित उदय जोशी यांच्यासह इतर मान्यवर. |
जरळी (वार्ताहर):स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये ४२ वर्ष लॅब असिस्टंट म्हणून केदारी केरुजी यांनी बजावलेली प्रदीर्घ सेवा ही निश्चितच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी केले.
मुगळी (तालुका गडहिंग्लज) येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून केदारी केरुजी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मजूर संघाचे माजी अध्यक्ष उदय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.स्वागत मुख्याध्यापिका व्ही .जी. लोहार यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते केदारी केरुजी या दांपत्याचा आराम खुर्ची देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संरपच बी. जी. स्वामी, रमेश आरबोळे, के.डी.धनवडे, शिवप्रसाद तेली, तानाजी शेंडगे, लक्ष्मणराव पोवार, आर. के. पाटील, जे. वाय.कांबळे,संतोष तेली यांच्यासह इतर मान्यवर,शिक्षक, कर्मचारी,ग्रामस्थ, मित्रमंडळी, नातेवाईक उपस्थित होते.