🔘दहावी परीक्षेत प्रशालेचा लागला शंभर टक्के निकाल
🔘श्रेया थोरात हलकर्णी केंद्रात प्रथम
हलकर्णी ( सुनील भुईंबर ) : बसर्गेतील श्रीमती म्हाळसाबाई नाडगोंडे प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. ६१ पैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील १२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीमध्ये ८ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.श्रेया सुभाष थोरात, हिने ९६.२० टक्के गुण मिळवत हलकर्णी केंद्रात प्रथम व प्रशालेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर भूमी विजय थोरात हिने ९६ टक्के गुण मिळवत केंद्रात द्वितीय व प्रशालेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर गौरी बसवाणी टोणपी ९४.२०टक्के गुण मिळवत बसर्गे प्रशालेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. हलकर्णी पूर्व भागात या प्रशालेने शिक्षण क्षेत्रात वेगळीच ओळख निर्माण केली आहे, विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उज्वल यशाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना बसर्गे एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा वर्षादेवी नाडगोंडे सरकार, उपाध्यक्ष कौस्तुभ नाडगोंडे सरकार, संस्थेचे सचिव आर. बी. टेळे यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले. मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

