Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जवान अविनाश कागिनकर यांच्यावर उद्या नंदनवाड येथे होणार अंत्यसंस्कार


गडहिंग्लज( प्रतिनिधी):
नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथील जवान अविनाश आप्पासाहेब कागिनकर यांच्यावर उद्या दिनांक २९ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पार्थिव नंदनवाड येथे उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आणण्यात येणार आहे. जवान अविनाश कागिनकर यांच्या निधनाची बातमी समजल्यापासून नंदनवाड गाव शोकाकुल आहे. नातेवाईकांसह ग्रामस्थ पार्थिवाची प्रतीक्षा करत आहेत.

 जवान अविनाश यांचे हिमाचल प्रदेश येथील धर्मशाला येथे सेवा बजावत असताना हृदय विकाराने निधन झाले आहे. ग्रामस्थांसह प्रशासनाने अंत्यसंस्काराची तयारी केली आहे.सरपंच शेवंता मगदुम, उपसरपंच बाबु केसरकर, मंडल अधिकारी व्ही.ए.कामत,तलाठी शिवपुत्र हिरेमठ, ग्रामसेवक दत्ता पाटील, गावातील आजी-माजी सैनिक, तरुण मंडळाचे कार्यकर्ते नियोजन करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.