![]() |
अब्दुल कोचरगी वैभव कोंडेकर यशवंत संकपाळ |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील सॉकर ट्रेनिंग सेंटरच्या तीन खेळाडूंची कासा बडवाणी एफ.सी. मध्यप्रदेश या संघाकडून युथ लीग व एम.पी फुटबॉल लीगसाठी निवड झाली आहे. अब्दुल रफिक कोचरगी, वैभव अनिल कोंडेकर व यशवंत अरुण संकपाळ यांचा समावेश आहे. मुंबई येथे झालेल्या अंतिम निवड चाचणी मधून या तिघांची कासा बडवानी एफ.सी संघात निवड झाली आहे.
अब्दुल व यशवंत हे शिवराज महाविद्यालयात शिकत असून वैभव वि. दि. शिंदे हायस्कूलचा विद्यार्थी आहे. १ जुलैपासून फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेमध्ये या तिन्ही खेळाडूंची चमकदार खेळाची कामगिरी पहावयास मिळणार आहे. या तिन्ही खेळाडूना प्रशिक्षक किरण कावणेकर, आकाश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंना डॉ. अनिल कुराडे, इमरान बांदार, मौसिन नदाफ, निखिल खन्ना यांनी शुभेच्छा दिल्या.