गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात फूड सायन्स व मायक्रोबायोलॉजी विभागाच्यावतीने करिअर मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. प्रारंभी स्वागत प्रा. संदीप गवळी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. विक्रम शिंदे यांनी केले. यावेळी नॅक विभागाचे समन्वयक प्रा. के.जे. अदाटे म्हणाले, बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरबाबत दक्ष राहिले पाहिजे. बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना फूड सायन्स व मायक्रोबायोलॉजीमध्ये विविध क्षेत्रात करिअर करण्यास बहुतांश संधी उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी फुड सायन्स व मायक्रोबायोलॉजी मध्ये पदवीधर अथवा पदव्युत्तर शिक्षण घेणे काळाची गरज आहे. असे त्यांनी सांगितले. मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रा. सुप्रिया व्हटकर यांनी मायक्रोबायोलॉजी या अभ्यासक्रमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन मिळाव्यास सायन्स विभागाच्या प्रा. टी.ए.काझी, डॉ.संदीप परीट, ग्रंथपाल संदीप कुराडे, डॉ. ए. जी. हारदारे, प्रा.रुडगी, प्रा. देसाई यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
शिवराज महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन मेळावा संपन्न
June 28, 2022
0