🔘राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण व प्रकाश योजनेअंतर्गत 25 लाख रुपये खर्चून विजेची सोय
🔘आमदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते योजनेचे उदघाटन
हत्तरगी (नामदेव पंढरी) : भरमापूर गावात विजेची सोय करण्यासाठी गेली आठ वर्षे आम्ही सतत प्रयत्न करीत होतो त्याचे आज फळ मिळाले. येथे वीज सुरू झाली असल्याची माहिती केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिली.
यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील भरमापूर गावात राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण व प्रकाश योजनेअंतर्गत 25 लाख रुपये भरून विजेची सोय करण्यात आली आहे. या योजनेचा प्रारंभ आमदार सतीश जारकीहोळी यांनी केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना आमदार जारकीहोळी म्हणाले, आणखी काही घरांना वीज पुरवठा लवकरच करण्यात येईल. एससी, एसटी लोकांना अनेक योजना आहेत. त्यांचा लाभ त्यांनी घ्यावा. काही अडचणी व समस्या असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अभियंता एम.जी. केबलापुरे, जोमलिंग पटोळी, ईराणा बंजिराम, राजेंद्र देसाई, पांडू मणीकेरी, बसापुर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष निलवा करोशी, उपाध्यक्ष लगमन्ना गुरव, बसू पुजारी, मल्लाप्पा नाईक, बसनायक कुंदरगी, मल्लाप्पा हंचीनमनी, मुरली बडगेर, मंजुनाथ पाटील, प्रवीण गुडकाइ, लगमवा कोचरी उपस्थित होते.

