Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करण्याची केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची सूचना

🔘इयत्ता १२ वी पर्यंतच्या शिक्षणात योगाला प्राधान्य देण्याचे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आवाहन

🔘राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड - 2022 आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे  केले उदघाटन


नवी दिल्ली (सौजन्य : पीआयबी):
  शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करण्याची सूचना केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री  धर्मेंद्र प्रधान  यांनी केली.  मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड - 2022 आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी बोलत होते.शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार हेही यावेळी उपस्थित होते.

१८ ते २० जून २०२२ या कालावधीत शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले आहे . यावर्षी २६ राज्ये,केंद्रशासित प्रदेश आणि प्रादेशिक शिक्षण संस्थांच्या बहुउद्देशीय शाळांमधील सुमारे ६०० विद्यार्थी  राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड यात सहभागी होत आहेत. 

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले,योग मानवजातीचे दुःख हरण करण्यास आणि शारीरिक लवचिकता निर्माण करण्यास, विशेषत: कोविड नंतरच्या काळात साहाय्यकारी असल्याचे  सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020(NEP)यात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर  विशेष भर देण्यात आला आहे.क्रीडाप्रकारांना शैक्षणिक व्यवस्थेत स्थान दिल्याने खिलाडूवृत्ती अंगी बाणेल आणि विद्यार्थ्यांना शारिरीक कार्यक्षमतेला जीवनात असलेले  महत्त्व समजेल, असेही ते म्हणाले.योग हा आरोग्य, निरामयता आणि शारीरिक शिक्षण याचा अविभाज्य घटक आहे.  त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला योगाचे प्राचीन ज्ञान आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची सूचना केली.  राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा  विकसित करण्याची  प्रक्रिया सुरू असून,  बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण (ECCE) ते इयत्ता 12वी स्तरापर्यंतच्या शिक्षणात योगास प्राधान्य दिले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  त्यांनी एनसीईआरटीला शाळा, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर योग ऑलिम्पियाड आयोजित करण्याचीही सूचना केली. प्रत्येक तालुक्यामधील शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्याने योगाचा वारसा पुढे जाईल आणि योग, जीवनशैली होण्यात  साहाय्य मिळेल,असे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडमध्ये राज्यांचे, केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व निवडक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. थेट तालुकास्तरावरून सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी  विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.