![]() |
| बसर्गे : येथील बी. एम. टोणपी विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमाचा प्रारंभ करताना सरपंच भारती रायमाने. यावेळी ग्रा. पं. सदस्य आनंद नांगनुरे, आप्पासाहेब टोणपी, रोहीत चीकबसर्गेकर आदी. |
हलकर्णी (सुनील भुईंबर) : बसर्गे येथील बी. एम. टोणपी मराठी विद्यालयात पहिलीच्या मुलांचा प्रवेशोत्सव समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भारती रायमाने होत्या. स्वागत मुख्याध्यापक पी.एच. वाके यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रा. पं.सदस्य आनंद नांगनुरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब टोणपी, सचिव अर्चना टोणपी, रोहित चीकबसर्गेकर, अशोक लवटे, युवराज परिट यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.

