![]() |
गडहिंग्लज : येथे जल्लोष करताना भाजपचे कार्यकर्ते. (छाया: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे गट व भाजपची सत्ता आल्याने गडहिंग्लज येथे गुरुवारी रात्री भाजपच्या कार्यकर्त्यानी मोठा जल्लोष केला. मुख्यमंत्रीपदी शिवसेना नेते एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस शपथबद्ध झाल्यानंतर गुरुवारी रात्री गडहिंग्लजमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी तसेच साखर वाटप करून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
![]() |
गडहिंग्लज : साखर वाटप करून आनंद साजरा करताना भाजपचे कार्यकर्ते. ( छाया: मज्जिद किल्लेदार) गडहिंग्लज : फटाक्यांची आतषबाजी करताना भाजपचे कार्यकर्ते. (छाया: मज्जिद किल्लेदार) |