🔘शिवराज महाविद्यालय व 56 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी यांच्याकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान
🔘कर्नल डी. एस. सयाना यांची प्रमुख उपस्थिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शिवराज महाविद्यालय व 56 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमात देशासाठी बलिदान दिलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूरचे कर्नल डी. एस. सयाना यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक 56 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी कोल्हापूर विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. राहुल मगदूम यांनी केले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. एन.सी.सी ज्यूनियर अंडर ऑफिसर तेजस्विनी मुळीक व ऋतुजा तोरस्कर यांनी देशभक्ती गीत सादर करून सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात शहीद जवान जोतिबा चौगुले,उंबरवाडी, बसाप्पा महार, नूल, आप्पाजी पाटील, सरोळी, नाना कदम, तनवडी, बाबुराव कापसे, नागोजी मोरे, नंदनवाड, श्रीधर कुरुणकर, जाधववाडी,शंकर नवलगी, गडहिंग्लज, शामराव तेलवेकर,कडगाव, आप्पाजी कदम,हसुरसासगिरी, दिलीप रेडेकर, बटकणंगले, उत्तम देसाई, कौलगे, रविराज कांबळे, जांभुळवाडी, संतोष देसाई, सावंतवाडी, उत्तम भिकले, हडलगे, दूरदुंडी कंकणवाडी, अरळगुंडी, सुनील जोशिलकर, लिंगनूर यांच्या कुटुंबियांचा 56 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी कोल्हापूरचे कर्नल डी. एस. सयाना यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
![]() |
| गडहिंग्लज : शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत ५६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी अधिकारी व जवान. (छाया:मज्जिद किल्लेदार) |
यावेळी बोलताना कर्नल सयाना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत अनेक शूर वीर जन्मले आहेत. या शूर वीरांच्या कार्याचा नेहमीच सन्मान होत आहे. हा सन्मान आम्हा सैनिकांना अभिमानास्पद आहे. सैनिक देशासाठी योगदान देत आहेत.त्यांच्या कुटुंबीयांनी नेहमीच केलेल्या सहकार्याची आठवण अधोरेखित होणे आवश्यक आहे. सैनिक सेवेत कार्यरत असताना त्यांची पत्नी कुटुंब सांभाळत असते. सैनिकांच्या मागे त्यांच्या पत्नीचे योगदानही फार मोलाचे आहेत, हे विसरू नये. कारण कोणतेही काम सहकार्याशिवाय होऊ शकत नाही.अशा या सैनिक कुटुंबाना आम्ही भेटून नेहमीच धन्यता मानत असल्याचे सांगून त्यांनी सैनिकांच्या कुटुंबासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
प्राचार्य डॉ. एस. एम.कदम म्हणाले,शिवराज महाविद्यालय हे नेहमीच राष्ट्रप्रेम जागृत करणारे विविध उपक्रम राबवित असते. असे उपक्रम राबवून समाजाशी ऋणानुबंध जपण्याचा आमचा प्रयत्न आजही सुरू आहे. या उपक्रमातून आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्या कार्याला मिळणारी ऊर्जा घेऊन आपल्या भविष्याची वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात शहीद जवान दूरदुंडी कंकणवाडी यांची कन्या भाग्यश्री कंकणवाडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, आजी-माजी सैनिक संघटनेचे कुमार पाटील, पर्यवेक्षक प्रा.टी.व्ही.चौगुले यांच्यासह शहीद जवानांचे कुटुंबिय 56 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी कोल्हापूरची टीम, प्राध्यापक,प्रशासकीय सेवक, एन.सी.सी कॅडेट,विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृता तराळ व श्रद्धा देसाई यांनी केले. आभार प्रा. एन.बी.इकिले यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन एन.सी.सी.कॅडेट यांनी केले.



