![]() |
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम.कदम व इतर. (छाया मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी आर्ट्स, मराठी व इंग्रजी माध्यम कॉमर्स, सायन्स परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे व प्राचार्य डॉ. एस. एम.कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. टी.व्ही.चौगुले यांनी केले. या कार्यक्रमात बोलताना शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे म्हणाले की, संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज नव्याने कात टाकत आहे. या कॉलेजचे ९० टक्क्यांच्या पुढे असलेले दहा विद्यार्थी गडहिंग्लज केंद्रात चमकले आहेत. हा आमच्या कॉलेजचा अभिमान आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना विद्या संकुलातील विविध विभागांमध्ये न्याय देण्यात येणार आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी शिवराज विद्या संकुल यांच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ.एस. एम.कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयात वर्गनिहाय गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी असे : बारावी कॉमर्स इंग्रजी माध्यम : मानसी मनोहर गुरव, स्नेहल संजय पोवार, प्राप्ती झुंजारराव देसाई, कॉमर्स मराठी माध्यम: सानिका बाळू फाळके, प्राजक्ता नंदकुमार कुंभार, समीक्षा अनिल धामणकर, बारावी सायन्स: दीक्षा रमेश मोरे, दिग्विजय दशरथ पाटील, पुनम प्रताप मोरे, बारावी आर्ट्स: वेदा चंद्रकांत आजगेकर, अवनी अनिलकुमार साळोखे, नवनाथ विठोबा शिंदे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी,पालक, सर्व शिक्षक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आशा पाटील यांनी केले.आभार प्रा. जयवंत पाटील यांनी मानले.
![]() |
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांसोबत संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम.कदम व इतर प्राध्यापक वर्ग. (छाया मज्जिद किल्लेदार) |