![]() |
तेरणी : येथे मारुती एच.पी.गॅस एजन्सीचे उदघाटन करताना संगमेश्वर सेवा संस्थेचे चेअरमन आण्णासो देसाई. यावेळी उपस्थित सरपंच मोसिम मुल्ला, मलाप्पा भंगारी,जब्बार मुल्ला, रियाज जमादार यांच्यासह इतर. |
गडहिंग्लज(प्रतिनिधी): श्रीमंत शाहू महाराज सीएससी सेंटर तेरणी यांच्या अंतर्गत श्री . मारूती एच.पी. गॅस हलकर्णी मार्फत तेरणी येथे एच.पी.गॅस एजन्सी सुरू करण्यात आली आहे. याचे उदघाटन सरपंच मोसिम मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली संगमेश्वर विकास सेवा संस्थेचे चेअरमन आण्णासो देसाई यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तेरणी गावात गॅस एजन्सी सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी सेवा संस्थेचे सदस्य शंकर निंबाळकर यांच्या हस्ते श्री.लक्ष्मी फोटो पूजन करण्यात आले. सुरुवातीला प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. प्रा . संजय गुरव , शिक्षक रमजान अंकली , सरपंच मोसिम मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हलकर्णीतील मारूती एच.पी.गॅसचे मालक अविनाश दुध्यागोळ, जब्बार मुल्ला,कलाप्पा मगदुम,अब्दुलकलाम जमादार , मलापा भंगारी,भरमा भोई,दिलावर साबखान,मौला जमादार,शब्बीर साबखान,सतीश यळमळी, गजबार साबखान , शंकर यादगुडी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सीएससी सेंटरचे प्रमुख रियाज जमादार यांनी आभार मानले.
![]() |
तेरणी : येथे मारुती एच.पी. गॅस एजन्सीच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर. |