![]() |
गडहिंग्लज : आरक्षण जाहीर करताना प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे. यावेळी उपस्थित मुख्याधिकारी स्वरूप खारगे. (छाया मज्जिद किल्लेदार) |
🔘 गडहिंग्लज नगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर
🔘 पालिकेत दिसणार महिलाराज
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रभाग निहाय आरक्षण सोडत येथील शाहू सभागृहात काढण्यात आले . यामध्ये प्रभाग १ अ हे अनुसूचित जातीसाठी तर प्रभाग ८ अ हे अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित ठेवण्यात आले. त्यामुळे केवळ हे दोनच प्रभाग आरक्षित झाले आहेत. उर्वरित सर्व प्रभाग सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आले.
![]() |
गडहिंग्लज :आरक्षण सोडतीची चिठ्ठी काढताना विद्यार्थिनी. (छाया :मज्जिद किल्लेदार) |
नगरपालिकेच्या शाहू सभागृहात प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. ज्ञानेश वाली, आर्यमन कुरणे, गौरव मांडेकर, शर्वरी पाटील, सिद्धी कांबळे, वैदेही सुर्वे या विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण सोडतच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. पालिका आरक्षण सोडत आज जाहीर झाल्याने आता इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे.
![]() |
गडहिंग्लज : आरक्षण सोडतीस उपस्थित पदाधिकारी व नागरिक. (छाया : मज्जिद किल्लेदार) |