Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दिलासादायक वृत्त : भारतातील कोरोना रोगमुक्ती दर ९८.६८ टक्के



🔘 देशात आतापर्यंत लसीच्या १९५ कोटी १९ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

🔘 १२ ते १४ वर्ष या वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या ३ कोटी ५१ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

🔘 भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या ४७,९९५

🔘 गेल्या २४ तासात देशात ८,०८४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

🔘 साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या २.२१ टक्के आहे

नवी दिल्ली (सौजन्य : पीआयबी) : सध्या कोरोना आजाराच्या सद्यस्थितीचा विचार करता भारतातील रोगमुक्ती दर आता ९८.६८ टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात ४,५९२ रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता ४,२६,५७,३३५ इतकी झाली आहे. एकंदरीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.

सोमवारी सकाळी ७ वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने १९५ कोटी १९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात २,५०,५६,३६६ सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

१६ मार्च २०२२ रोजी देशातील १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत ३ कोटी ५१ लाखांहून अधिक किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे १८ ते ५९ या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील १० एप्रिल २०२२ पासून सुरु करण्यात आले आहे

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता ४७,९९५ इतकी आहे.देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या केवळ 0.११ टक्के आहे.परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता ९८.६८ टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात ४,५९२ रुग्ण कोविड आजारातून बरे झाले असून नव्या ८,०८४  रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासात देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण २,४९,४१८ चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर ८५ कोटी ५१ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या २.२२ टक्के असून दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर ३.२४ टक्के इतका आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.