![]() |
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत बोलताना डॉ. दत्ता पाटील. यावेळी उपस्थित इतर मान्यवर. |
गडहिंग्लज : आजच्या काळात संशोधनाला आलेले महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक उच्चशिक्षित विद्यार्थ्याने संशोधन करणे गरजेचे आहे. संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये एक उर्मी, जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. अशी संशोधनात्मक वृत्ती जोपासल्या शिवाय संशोधन होऊ शकत नाही, तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याने संशोधनाविषयीची आवड जोपासणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन डॉ. दत्ता पाटील यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आयोजित संशोधन पद्धती या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.महेश चौगुले यांनी करून दिला. यावेळी मार्गदर्शन करताना कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटीचे डॉ. सागर पोवार यांनी संशोधन पद्धतींचा संशोधनात कसा वापर करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. एस. के.चव्हाण, डॉ. दयानंद पाटील यांच्यासह अन्य प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अशोक मोरमारे यांनी केले. आभार प्रा. एन. बी. एकिले यांनी मानले.