![]() |
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात डॉ. अर्चना उगळे यांचे स्वागत करताना प्रा. किसनराव कुराडे. यावेळी उपस्थित प्राचार्य एस. एम. कदम व इतर. |
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्यावतीने आझादी का अमृत महोत्सव वर्षा अंतर्गत दिनांक 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावर डॉक्टर अर्चना भगवान उगळे यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगून तंबाखू न खाण्याची शपथ विद्यार्थ्यांकडून घेतली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे हे होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम.कदम उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.सुप्रिया व्हटकर यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व सायन्स विभागाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. के.जे. अदाटे यांनी आभार मानले.