Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या

महागाव : येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विविध कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ.एस.एच.सावंत,प्लेसमेंट प्रमुख व शिक्षक.

अंतिम वर्षाच्या १५५ विद्यार्थ्यांची निवड ; विद्यार्थी,पालकांमध्ये आनंद



💎गडहिंग्लज : महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील  अंतिम वर्षाच्या १५५ विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकऱ्या  मिळाल्या आहेत. परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. 

मिळालेले नॕक नामांकन आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता व इतर बाबींचा विचार करत राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या थेट कॅम्पसमध्ये येऊन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा, समूह चर्चा आणि मुलाखती घेऊन निवड केली असून काही कंपन्यांनी थेट ऑनलाइनद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवडीचे पत्र दिले. प्रमुख कंपन्यांमध्ये सोपरा स्टेरिया, कॅपजेमनी, टीसीएस, अॕक्टि सिस्टिम, अॕटोस सिंटेल, जी.एस.लॕब, इन्फोसिस, टेक महिंद्रा ,सेहगल ऑटो, विप्रो यासारख्या नामांकित तेवीस कंपन्यांमधून विद्यार्थ्यांची निवड झाली.यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांना सात लाखांहून अधिक वेतनवर निवड झाली तर १५ विद्यार्थ्यांना दोन पेक्षा अधिक कंपन्यांकडून नोकरीची संधी मिळाली आहे. दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थी व पालकांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला . संस्थाअध्यक्ष अॕड.आण्णासाहेब चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देताना म्हणाले, विद्यार्थी जेव्हा प्रथम अथवा थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतात तेव्हा प्लेसमेंटच्या माध्यमातून हमखास नोकरी मिळेल अशी अपेक्षा ठेवतात तसेच पालकही आपले पाल्य आता या स्पर्धेच्या  काळात प्लेसमेंट मिळणार अशी महत्त्वाकांक्षा बाळगून पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संत गजानन महाराज शिक्षण समूहातील विविध उपक्रमांना साथ देत असतात यामुळेच ग्रामीण विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीमध्ये नोकर्‍या मिळवून देण्यात आम्ही यशस्वी होत आहोत.यावेळी सचिव अॕड बाळासाहेब चव्हाण ,डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, प्राचार्य डॉ.एस.एच.सावंत, प्लेसमेंट प्रमुख प्रा. संतोष गुरव ,प्रा. महेश बंदी व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.