गडहिंग्लज : युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय दिल्ली आयोजित नेताजी सुभाषचंद्र विश्वविद्यालय येथील राष्ट्रीय एकता शिबिरात घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शिवराज महाविद्यालयाच्या एन.एस.एस विभागाची तब्बसुम गुलाब छडेदार या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकाविला. या शिबिरात राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. तब्बसुमच्या या नेत्रदीपक यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तब्बसुमला संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन तर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.पी.खेडकर, डॉ. जी.जी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
![]() |
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात तब्बसुम छडेदार हिचे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्यासह इतर. |