नवी दिल्ली (सौजन्य : पीआयबी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मनुष्यबळ स्थितीचा आढावा घेतला आहे. पुढील दीड वर्षात युद्धपातळीवर १० लाख लोकांची भरती सरकारने करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की,"पंतप्रधान @narendramodi यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मनुष्यबळ स्थितीचा आढावा घेतला आणि येत्या दीड वर्षांत युद्धपातळीवर १० लाख लोकांची भरती सरकारने करावी असे निर्देश दिले.