![]() |
महागाव : संत गजानन इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रथम प्रवेशीत संकेत मुरगी या विद्यार्थ्यांला तात्पुरते प्रवेश पत्र देताना प्राचार्य डॉ.एस.एच.सावंत व शिक्षक. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहातील विद्याशाखेत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील प्रवेशासाठी गडहिंग्लज उपविभागात सात ठिकाणी शासनमान्य सुविधा केंद्रे सुरू करण्यात आले आहेत.यासाठी विद्यार्थी व पालकवर्गाकडून उस्फूर्थ प्रतिसाद मिळत आहे.
पॉलिटेक्निक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ऑनलाइन पोर्टल सुरू केला आहे.याद्वारे विद्यार्थ्यांना डिप्लोमा प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे.२ जून पासून नोंदणी सुरू असून ३० जून ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.तर पदवी इंजिनिअरिंगसाठी तात्पुरती प्रवेश प्रक्रिया चालू आहे. चंदगड येथे जुने बस स्थानक संभाजी चौक, दोडामार्ग येथे महालक्ष्मी पॅलेस बाजारपेठ, आजरा येथे गजरे बिल्डिंग संभाजी चौक,कोवाड येथील सर्वर कॉम्प्युटर निटुर रोड, उत्तुर येथे अविसॉफ्ट कॉम्प्युटर मेन रोड, महागाव येथे प्रधान कार्यालय व कर्नाटकासाठी निपाणी व संकेश्वर या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया बाबतची सर्व माहिती व मार्गदर्शन तसेच ऑनलाईन नोंदणी या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन रजिस्टार शिरीष गणाचार्य यांनी केले आहे.
Excellent
ReplyDelete