![]() |
महागाव : येथील संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयातील जीपॅट परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. एस. जी. किल्लेदार, प्रा.सुनिल गळतगे व मार्गदर्शक शिक्षक. |
महाविद्यालयाच्या सुरूवातीपासूनच या परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या वर्षीही ही परंपरा कायम राखत सहा विद्यार्थ्यांनी यश संपादित करत शिष्यवृती मिळवली आहे. यासाठी महाविद्यालयाने केलेले प्रयत्नही तितकेच मोलाचे आहेत. ऑनलाईन वर्ग घेणे, परीक्षेसाठी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन देणे व ऑनलाईन सराव परीक्षा घेणे या सर्वांचे फलित म्हणून यशाची ही परंपरा कायम राखत महाविद्यालयाची यशस्वी घोडदौड चालू असल्याची माहिती प्राचार्य डॉ.एस.जी.किल्लेदार यांनी दिली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थाध्यक्ष अॕड.आण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. या परीक्षेच्या तयारीसाठी प्राचार्य डॉ.एस.जी.किल्लेदार, समन्वयक प्रा. सुनिल गळतगे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.