![]() |
तेरणी : येथील आरोग्य उपकेंद्रात माता व बाळाची तपासणी करताना आरोग्य सेविका जयश्री कांबळे. यावेळी उपस्थित गीता निंबाळकर, सुजाता अगसगी व इतर. |
गडहिंग्लज : तेरणी येथील आरोग्य उपकेंद्रात प्रसुती विभाग सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी नीलिमा धबाले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका जयश्री कांबळे यांच्या देखरेखीखाली दिनांक २४ मे रोजी या उपकेंद्रात प्रसुती विभाग सुरू करण्यात आला. यासाठी सरपंच मोसिम मुल्ला, उपसरपंच आक्काताई हजेरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके यांच्यासह गीता निंबाळकर, सुजाता अगसगी यांचे सहकार्य लाभले.