![]() |
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी व पालक मेळाव्यात बोलताना सचिव डॉ. अनिल कुराडे.यावेळी उपस्थित प्राचार्य डॉ. एस .एम कदम, डॉ. ए. एम हसुरे. |
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयाच्या माध्यमातून सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे सर्व उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा. पालकांनीही आपल्या पाल्यावर लक्ष ठेवून त्यांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिल कुराडे यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात रसायन शास्त्र विभागाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी व पालकांच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस. एम.कदम होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ. बी. डी. अजळकर यांनी केले. रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए .एम.हसुरे यांनी विभागाचा आढावा घेतला. या मेळाव्यामध्ये प्राचार्य डॉ.कदम यांनीही महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थी व पालकांसमोर सादर केली. पालक संजय कुलकर्णी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी पालक सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अल्ताफहुसेन नाईकवाडे यांनी केले. आभार प्रा. ए.पी. तेलवेकर यांनी मानले.