![]() |
गडहिंग्लज : येथे जंगम समाजाच्या स्नेहमेळावा व वधू-वर मेळाव्यात मार्गदर्शन करताना गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी .व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर. |
गडहिंग्लज : भगवंतांचे आशीर्वाद हे जंगम समाजाला वर आहे म्हणूनच जंगम समाजाला फार महत्त्व आहे.विविध मठाचे मठाधिपती,स्वामीजी हे जंगम समाजाचे असतात.प्रत्येक गावात जंगम समाजाकडे देवाची पूजा अर्चा असते,म्हणुन त्या त्या गावांमध्ये जंगम समाजाला फार महत्व आहे.आज जंगम समाज एकत्र येण्याची गरज आहे.जंगम समाजातील मुलं मुली देण्या घेण्यात मंगळ पाहण्यापेक्षा त्यांची मने जुळतात कि नाही ते पाहिले पाहिजे असे प्रतिपादन नूल येथील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती गुरुसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी जंगम समाजाच्या स्नेहमेळावा व वधुवर मेळाव्यात बोलताना केले.
स्वागत अध्यक्ष महेश तुरबतमठ यांनी केले.दिपप्रज्वलन गुरुसिध्देश्वर स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक अरुण हिरेमठ यांनी केले.अशोकराव स्वामी, अलका स्वामी,सतिश घाळी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जंगम समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व निवड झालेल्या मान्यवरांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महेश तुरबतमठ, राजशेखर हिरेमठ, रामया पुजारी, श्रीकांत स्वामी, अरूण हिरेमठ, शिवानंद गणाचारी, अशोक स्वामी, राचया स्वामी, विजय हिरेमठ, बाळया स्वामी, आपया जंगम, शिवशंकर स्वामी, कलया स्वामी, शिवानंद पुजारी, निळकंठ हिरेमठ, चंद्रशेखर मठदेवरु, निळकंठ स्वामी यांच्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील जंगम समाज बांधव उपस्थित होते.आभार संरपच बी. जी. स्वामी यांनी मानले.
![]() |
गडहिंग्लज : येथे जंगम समाजाच्या स्नेहमेळावा व वधू-वर मेळाव्याचे दीपप्रज्वलनाने उदघाटन करताना गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी. यावेळी उपस्थित अन्य मान्यवर. |