![]() |
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम. कदम यांच्यासह प्राध्यापक वर्ग. |
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालय येथील बीसीएस व बीएससी संगणक विभागातील बावन्न विद्यार्थ्यांची विप्रो, कॅपजेमेनी, इन्फोसिस, इलेक्ट्रोटेक या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये कॅम्पस मुलाखतीमधून निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲडवोकेट दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एम.कदम तर संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. रवी खोत यांनी केले. यावेळी संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी शिवराजच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी कॅम्पस मुलाखतीमधून निवड होऊन आपल्या करिअरला सुरुवात करीत आहेत हे आम्हाला अभिमानास्पद आहे. अशीच परंपरा शिवराजने कायम जपली आहे. या परंपरेला साजेसे असे कार्य प्रत्येक वर्षी या विद्या संकुलामध्ये पहावयास मिळत असल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडवोकेट दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. कदम, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आम्ही शिवराज महाविद्यालयामुळे खऱ्या अर्थाने घडलो आणि आमच्या वाटचालीला शिवराज महाविद्यालयामुळेच खरे बळ मिळाले असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमास विना अनुदानित विभागाचे समन्वयक प्रा. आझाद पटेल, बीसीए विभाग प्रमुख प्रा. के.एस. देसाई, पी.आर.ओ. प्रा. विक्रम शिंदे, बीसीएस व बीएससी संगणक विभागातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.