गडहिंग्लज : तेरणी येथील अशोक रावसाहेब देसाई हायस्कूल मध्ये 1987-88 च्या वर्ग मित्रांचा स्नेहमेळावा दिनांक 8 मे रोजी उत्साहात पार पाडला. त्यामध्ये माजी-आजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या शाळेतून 1987-88 या वर्षी बाहेर पडलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .प्रास्ताविक पी .पी.नाईक यांनी केले . सूत्रसंचालन डी एस नाईक यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मोहसीन मुल्ला होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी मुख्याध्यापिका सौ .हालबागोळ होते.
यावेळी 'जीवन सुंदर आहे' ही व्याख्यानमाला जीएसटीचे राज्य कर निरीक्षक डि. एल.भोगुलकर यांनी विस्तृतपणे सांगितली.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रामा बाळकर, अनुसया अगसगी, शिवलीला देसाई, बी टी देसाई . एन बी हालबागोळ, एस के गोंदुकोपी यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.

