![]() |
| महागाव : येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित शिष्योपनयन संस्कार विधी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सुत्रबंधन करताना शिक्षक . |
गडहिंग्लज : महागाव येथील संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या नवागत विद्यार्थ्यांचा शिष्योपनयन संस्कार विधी उत्साहात संपन्न झाला.येथील गजानन महाराज मंदिरात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अॕड. आण्णासाहेब चव्हाण होते. प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे यांनी स्वागत करून संस्कार विधीचे महत्त्व पटवून दिले . तसेच महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी अॕड. चव्हाण अध्यक्षीय भाषणात म्हणाले, समाजाचा डॉक्टरवर प्रचंड विश्वास असतो. ध्येयाने प्रेरित होऊन नियोजनपूर्वक अभ्यास, ज्ञान आत्मसात करून जबाबदार डॉक्टर बनून रुग्णसेवा करावी. शैक्षणिक वेळेत मोबाईलचा वापर न करता अधिकाधिक वेळ अध्ययनाकडे लक्ष देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.यावेळी पुण्यवचन, गणपतिपूजन, धन्ववंतरी, शुश्रुत ,माधव,चरक स्थापना व नवग्रह आवाहन अग्निपूजन व आहूती या विधीसह व शिष्यांना गुरूकडून सूत्र बंधन व प्रतिज्ञा ग्रहण केली. गुरू-शिष्याची परंपरा खंडित करावी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने आयोजित केलेल्या संस्कार विधीचे पौराहित्य म्हणून डॉ. विनायक गरुड व जयंत कुलकर्णी व बोराडे यांनी काम पाहिले.डॉ.यशवंत चव्हाण, डॉ.संजय चव्हाण, डॉ.प्रतिभा चव्हाण, डॉ.सुरेखा चव्हाण, सचिव अॕड.बाळासाहेब चव्हाण, प्रा.अजिंक्य चव्हाण, प्रा.कल्याणी चव्हाण यांनी संस्कार विधीस उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व पालक उपस्थित होते. डॉ. दिग्विजय पाटील यांनी आभार मानले.


