गडहिंग्लज : येथील शिवराज विद्यासंकुल व अन अकॅडमी बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 व 13 मे रोजी खास विद्यार्थ्यांसाठी करियर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याचे उदघाटन जागतिक अर्थतज्ञ डॉक्टर परशुराम पाटील व पोलीस उपअधिक्षक राजू नवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या महामेळाव्यात पुणे व बेंगलोर येथील तज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रातील करिअर संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे, उपाध्यक्ष ॲडवोकेट दिग्विजय कुराडे व संस्थेचे पदाधिकारी तसेच अन अकॅडमीचे मोहित शर्मा, आदित्य शर्मा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव डॉक्टर अनिल कुराडे, प्राचार्य डॉक्टर एस .एम .कदम यांनी केले आहे. या महामेळाव्या बाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी समन्वयक डॉक्टर महेश चौगुले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्यातील सहभागी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार असून यामध्ये विजेत्यांना अनुक्रमे आयपॅड , सॅमसंग टॅबलेट, स्मार्ट वॉच यासह इतर बक्षिसे देण्यात येणार आहेत.
शिवराज महाविद्यालयात 12 व 13 मे रोजी करिअर महामेळाव्याचे आयोजन
May 10, 2022
0