गडहिंग्लज : हरळी खुर्द येथे श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त गावात चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॅरम स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा, हातात कासरा धरुन बैल पळविणे,मोफत आरोग्य शिबीर, महिलांसाठी होम मिनिस्टर, मॅराथॉन स्पर्धा, तसेच ह.भ.प तुकाराम महाराज देसाई यांचे कीर्तन, अवधूत सांप्रदायिक भजनी मंडळ हरळी बुद्रुक यांचे भजन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळच्या सत्रात संत गोरा कुंभार मूर्तीची महापूजा , संध्याकाळी दिंडी व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. रात्री महाप्रसाद व साके (ता कागल )येथील माऊली सोंगी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी चंद्रकांत कुंभार,उपसरपंच रामदास कुंभार.,मोहन कुंभार, शिवाजी कुंभार, उज्वल कुंभार,रामदास कुंभार, सदाशिव कुंभार, बाबुराव कुंभार, अनिल कुंभार, रमेश कुंभार, मारुती कुंभार, परशराम कुंभार, पांडुरंग कुंभार, पुंडलिक कुंभार,पांडुरंग म्हेत्री, महादेव हुलगे ,डीडू आर्ट्स यांच्यासह सर्व कुंभार समाज,श्री संत गोरा कुंभार मंडळ, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले .
हरळी खुर्द येथे संत गोरा कुंभार पुण्यतिथी सोहळा संपन्न
May 09, 2022
0