गडहिंग्लज : संत गजानन फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून द्वितीय वर्ष बी फार्मसी व एम फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी किल्ले सामानगड येथे स्वच्छता मोहीम व साफसफाई करण्यात आली. यावेळी 'एक विद्यार्थी एक वृक्ष, एक लिटर पाणी' हा आगळा वेगळा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉक्टर रवींद्र कुंभार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला . यावेळी विद्यार्थ्यांनी किल्ल्यावरील वृक्षांना पाणी घातले .यावेळी एनएसएसचे डॉक्टर समीर नदाफ, प्राध्यापक स्वाती कारंडे, प्राध्यापक स्वप्नील हराळे, अकाउंटंट दशरथ तेलवेकर, महादेव पाटील, संदीप पाटील, अमर केसरकर, विजय पाटील उपस्थित होते. या उपक्रमास डॉक्टर एस.जी . किल्लेदार यांचे मार्गदर्शन लाभले.
![]() |
| किल्ले सामानगड : येथे स्वच्छता मोहीम राबविताना संत गजानन फार्मसीचे विद्यार्थी. |


