तेरणी : येथील श्री करनाईक देवाची यात्रा दिनांक 11 मे रोजी संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी यात्रेची जोरदार तयारी सुरू केली आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष ग्रामस्थांनी यात्रा साजरी केली नव्हती. तब्बल दोन वर्षानंतर यावर्षी ग्रामस्थांना यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करता येणार आहे. यात्रेमुळे गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून यात्रेच्या निमित्ताने गावात भक्तिमय वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामस्थ घराची स्वच्छता , रंगरंगोटी , पै पाहुण्यांना निमंत्रण देण्याच्या कामात गुंतल्याचे दिसत आहे. यात्रेच्या निमित्ताने गावात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

