शिवराज महाविद्यालयात कार्यशाळा
![]() |
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राध्यापक ऋषिकेश भांबुरे. यावेळी उपस्थित इतर मान्यवर. |
💎गडहिंग्लज : करिअरची विविध क्षेत्रे आज विकसित झालेली आहेत. परंतु ॲनिमेशन सारखे हमखास रोजगार उपलब्ध करुन देणारे क्षेत्र आज जगामध्ये नावारूपाला येत आहे. हे क्षेत्र रोजगारासाठी उत्तम पर्याय ठरू शकते असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय सातारा येथील प्रा. ऋषिकेश भांबुरे यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे होते. यावेळी प्रा. एन.बी.एकीले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे म्हणाले, करिअर ही काळाची गरज आहे. सध्याच्या ऑनलाइन शिक्षण व्यवस्थेमध्ये किंवा शिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. केजी टू पीजी तसेच सर्वच क्षेत्रात ॲनिमेशन, ग्राफिक डिझाईन यांना फार मागणी आहे. त्यासाठी संस्थेने विद्यार्थ्यांची गरज ओळखून बीएससी ॲनिमेशन हा अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू केला आहे. त्याचा फायदा नक्कीच ह्या उपविभागातील विद्यार्थ्यांना होईल असे सांगितले. यावेळी संगणक विभाग प्रमुख प्रा. पी.टी.गोयल, पीआरओ प्रा.विक्रम शिंदे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक प्रा. चेतन मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डी.पी.खेडकर यांनी केले. आभार प्रा. अशोक मोरमारे यांनी मानले.