![]() |
| गडहिंग्लज: एनसीसी कॅडेडचा सत्कार करताना डॉक्टर अनिल कुराडे. यावेळी प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्यासह इतर. |
गडहिंग्लज: येथील शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिल कुराडे यांचा 57 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिल कुराडे यांचा सत्कार विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवराज विद्यासंकुल व जयहिंद फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास जयहिंद फाउंडेशनचे संचालक, शिवाजी विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर केशव राजपुरे व शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर ए बी कुंभार यांनी केले. या कार्यक्रमात डॉक्टर रंगराव हेंडगे लिखित कर्ते सुधारक या पुस्तकाचे वितरण एनसीसीच्या कॅडेडना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमात पाथ सीड्स फाउंडेशन पुणे व शिवराज विद्यासंकुल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. जयहिंद फाऊंडेशनचे संचालक डॉक्टर केशव राजपुरे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्राध्यापक बाबर यांनी शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचा जीवनपट सांगितला .यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी मौलिक मार्गदर्शन केले . संस्थेचे उपाध्यक्ष जे.वाय. बारदेस्कर, प्राचार्य डॉक्टर एस एम. कदम,डॉ. केशव राजपुरे , पाथ फाऊंडेशनचे डॉ. सलिल राजगुरू, सरपंच ईश्वर देसाई, बसवराज आजरी,डॉ. नंदकुमार कोल्हापुरे, प्राध्यापक सौ. बिनादेवी कुराडे , मुख्याध्यापिका गौरी शिंदे ,प्राध्यापक टी.व्ही .चौगुले,डॉक्टर महेश चौगुले ,डॉ रंगराव हेंडगे,माजी सैनिक कुमार पाटील आदींनी मनोगतातून डॉक्टर अनिल कुराडे यांना शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती डॉक्टर अनिल कुराडे यांनी सत्काराला उत्तर देताना समाजाच्या गरजा ओळखून विद्या संकुलात बीएससी नर्सिंग, एमबीए , मुलींसाठी स्वतंत्र एनसीसी विभाग तसेच बी एच एम एस महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून समाजाच्या व ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांकरीता शिवराज विद्यासंकुल बहुमोल योगदान देण्याचे कार्य करीत राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी डॉक्टर अनिल कुराडे यांना विविध मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडवोकेट दिग्विजय कुराडे, सोमगोंडा आरबोळे, नंदनवाडे गुरुजी, ॲडवोकेट सतीश इटी यांच्यासह अन्य मान्यवर , प्राध्यापक,प्रशासकीय सेवक विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर श्रद्धा पाटील यांनी केले . जनसंपर्क अधिकारी प्राध्यापक विक्रम शिंदे यांनी आभार मानले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: गडहिंग्लज बुलेटीन न्युज,(GB News) 9844727598


