गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राध्यापक कुराडे यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगितले. प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनी १
मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. असे सांगून कामगारांसाठी कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्राध्यापक किशोर अदाटे, ग्रंथपाल संदीप कुराडे, मुख्याध्यापिका गौरी शिंदे यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. क्रीडा शिक्षक प्राध्यापक जयवंत पाटील यांनी आभार मानले.

