तेरणी : तेरणी ता.गडहिंग्लज येथे अशोक रावसाहेब देसाई हायस्कूल च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिनांक 8मे रोजी सकाळी 11 वाजता तेरणी येथे संपन्न होणार आहे.यावेळी माजी शिक्षक-शिक्षकेतर या कर्मचाऱ्यांचे सत्काराचे नियोजन केले आहे.अशोक रावसाहेब देसाई हायस्कूल तेरणीच्या ज्ञानपीठातून बाहेर पडलेले 1987-88 बॅचचे विद्यार्थी केवळ बाहेर पडलेले नसून ते स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तृत्वसंपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले माजी विद्यार्थी आहेत.ह्या शाळेचे माजी विद्यार्थी महाराष्ट्राच्या व महाराष्ट्राबाहेरील कानाकोपर्यात शासकीय-निमशासकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत.काही विद्यार्थी विविध व्यवसायामध्ये आपले नाव कमावले आहेत.बत्तीस वर्षापूर्वी बाहेर पडलेले विद्यार्थी आज भारतात विविध ठिकाणी स्थिरस्थावर झाले आहेत.ज्यांचा ऋणानुबंध आजही अशोक रावसाहेब देसाई हायस्कूल परिवाराशी जोडलेला आहे.स्मृतींनी कायमची मनात घरे करून गेलेल्या या माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेहमेळावा तेरणी येथील हायस्कूलमध्ये आयोजित केला आहे. या स्नेहमेळाव्यास आपण सर्व माजी विद्यार्थी -विद्यार्थीनींनी मित्रांना स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी संपर्क साधावा.या मेळाव्यास उपस्थित राहून शाळेबद्दलचे आणि गुरुजनांचे प्रेम आणि आदर व्यक्त करावे असे जाहीर आवाहन संयोजन समिती तर्फे डि. एस. नाईक, अनुसया अगसगी,रामा बाळकर, यांनी केले आहे.
तेरणी येथे 8 मे रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
May 02, 2022
0
